स्वच्छता अभियानाला अधिकाºयांचा ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:19 IST2017-09-12T20:19:41+5:302017-09-12T20:19:41+5:30
येत्या १ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील नागरी भाग हागणदरीमूक्त घोषीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी महापालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतस्तरावर गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग पथके सक्रीय करण्यात आली आहेत. आता या पथकांमध्ये आयुक्त, उपायुक्त, मुख्याधिकाºयांसह नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचाही समावेश करण्याचे शासनाचे निर्देश असताना जिल्ह्यातील बहुतेक शहरात ही पथके सक्रीय असल्याचे दिसत नाहीच शिवाय अधिकारी आणि नगरसेवकही यामध्ये सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत नाही.

स्वच्छता अभियानाला अधिकाºयांचा ‘खो’
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: येत्या १ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील नागरी भाग हागणदरीमूक्त घोषीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी महापालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतस्तरावर गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग पथके सक्रीय करण्यात आली आहेत. आता या पथकांमध्ये आयुक्त, उपायुक्त, मुख्याधिकाºयांसह नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचाही समावेश करण्याचे शासनाचे निर्देश असताना जिल्ह्यातील बहुतेक शहरात ही पथके सक्रीय असल्याचे दिसत नाहीच शिवाय अधिकारी आणि नगरसेवकही यामध्ये सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत नाही.
राज्यातील शहरे हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रत्येक शहराने उघड्यावरील हागणदारीची ठिकाणे निष्कासीत करण्यासाठी ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथके कार्यरत करण्याबाबतच्या
सूचना शासनाकडून पूर्वीच देण्यात आल्या आहेत. या ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकांना अधिक सक्रीय होवून दररोज पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करावे लागणार आहे. नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकाºयांना त्यांच्या क्षेत्रातील ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकात स्वत: सहभागी होणे आवश्यक आहे. या ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकांत नगराध्यक्ष व संबंधित वार्ड किंवा प्रभागाच्या नगरसेवकांनाही सहभागी करून घ्यावे लागणार आहे. या पथकाने उघड्यावरील हागणदारीची ठिकाणांची पाहणी केल्यानंतर उघड्यावर शौचास करणारे व्यक्ती न आढळल्यास त्यानुसार अहवाल, तसेच उघड्यावर शौचास बसताना व्यक्ती आढल्यास अनुषंगिक कारवाई करण्यासह प्रतिबंधात्मक उपाय योजना करून त्या उपाय योजनांचा अहवाल आयुक्त, नगर परिषद / नगर पंचायतींच्या मुख्याधिकाºयांना दररोज सकाळी ११ वाजता स्वच्छ महाराष्ट्र या नावाने सुरू केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकावा लागत आहे. तथापि, जिल्ह्यातील काही शहरांत या पथकांची कारवाई थंडावली असून, अधिकारी, नगरसेवकही याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या संदर्भात वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रशासन अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे वस्तूस्थिती कळू शकली नाही.
आम्ही गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकासाठी अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केली असून, हे पथक शहरात नियमित आपली जबाबदारी पार पाडत आहे. सुटीच्या दिवशी या पथकात एखादवेळी सहभागी होता आले नसेल, इतर वेळी आम्ही सर्वच पथकासोबत फिरतो. यादरम्यान आम्हाला उघड्यावर शौच करणारे व्यक्ती आढळले नसल्याने कारवाई करता आली नाही.
- श्रीकृष्ण वाहूरवाघ, मुख्याधिकारी नगर परिषद मंगरुळपीर