उंबर्डा येथे सार्वजनिक विहिरीची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST2021-07-01T04:27:54+5:302021-07-01T04:27:54+5:30

उंबर्डा बाजार येथील बैल बाजारात असलेल्या सार्वजनिक विहिरीची गेल्या कित्येक वर्षांपासून सफाई झालेली नव्हती. यामुळे केरकचरा साचून दुर्गंधी सुटली ...

Cleaning of public wells at Umbarda | उंबर्डा येथे सार्वजनिक विहिरीची स्वच्छता

उंबर्डा येथे सार्वजनिक विहिरीची स्वच्छता

उंबर्डा बाजार येथील बैल बाजारात असलेल्या सार्वजनिक विहिरीची गेल्या कित्येक वर्षांपासून सफाई झालेली नव्हती. यामुळे केरकचरा साचून दुर्गंधी सुटली होती. याच विहिरीत दरवर्षी देवी-देवतांच्या मूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने त्याचाही गाळ साचून होता. पूर्वी याच विहिरीवरून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविले जायचे. मात्र, पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर ही विहीर दुर्लक्षित ठरली. दरम्यान, विहिरीतील गाळ हटविण्यात आला असून, स्वच्छ पाणीसाठा झाल्याने गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

................

बाॅक्स :

लोखंडी जाळी बसविण्याची मागणी

उंबर्डाबाजार येथील बैल बाजारात असलेल्या सार्वजनिक विहिरीची स्वच्छता झाली. त्यामुळे आता विहिरीत शुद्ध पाणी गोळा होत आहे. भविष्यात पाणी पुन्हा खराब होऊ नये, यासाठी विहिरीवर आता संरक्षक लोखंडी जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Cleaning of public wells at Umbarda