शाळा परिसरात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:55+5:302021-02-05T09:22:55+5:30
-------- भुईमुग बियाण्यांची मागणी इंझोरी : परिसरात उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीवर शेतकरी भर देत असतानाच या पिकाच्या अनुदानित बियाण्यांचा मोठा ...

शाळा परिसरात स्वच्छता अभियान
--------
भुईमुग बियाण्यांची मागणी
इंझोरी : परिसरात उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीवर शेतकरी भर देत असतानाच या पिकाच्या अनुदानित बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकरी त्यामुळे अडचणीत सापडले असून, कृषी विभागाने या पिकाच्या अनुदानित बियाणे उपलब्ध करावे, अशी मागणी देवानंद हळदे, गजानन ढोक, खुशालराव गावंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी गुरुवारी केली.
---------
दापुऱ्यात आरोग्य तपासणी
इंझोरी : गेल्या आठवडाभरापूर्वी दापुरा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून दक्षतेच्या दृष्टिकोनातून गावात आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींसह गावातील इतरही व्यक्तींची तपासणी केली जात आहे.
--------
किसान ब्रिगेडच्या कार्यकारिणीची निवड
वाशिम : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या किसान ब्रिगेड संघटनेच्या वाशिम जिल्हा कार्यकारिणीची निवड सोमवारी करण्यात आली. संघटनेचे संस्थापक प्रकाश पोहरे यांच्या मार्गदर्शनात या संघटनेच्या तोंडगाव सर्कल प्रमुखपदी कोकलगाव येथील अमोल बबन काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
३५ वाहनांवर कारवाई
वाशिम : शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत वाशिम शहरात बुधवार २७ जानेवारी रोजी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५ वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट नसणे, वाहन क्रमांक नसणे, कागदपत्रे नसण्यासह आसन मर्यादेच्या उल्लंघन प्रकरणी ही कार्यवाही करण्यात आली.
------------