स्वच्छ ग्राम स्पर्धेतील गावांची तपासणी!

By Admin | Updated: March 17, 2017 02:44 IST2017-03-17T02:44:14+5:302017-03-17T02:44:14+5:30

तालुकास्तरीय तपासणीत पात्र ठरलेल्या आठ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी १५ मार्च रोजी करण्यात आली.

Clean Village Village checkup villages! | स्वच्छ ग्राम स्पर्धेतील गावांची तपासणी!

स्वच्छ ग्राम स्पर्धेतील गावांची तपासणी!

वाशिम, दि. १६- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २0१६-१७ मध्ये तालुकास्तरीय तपासणीत पात्र ठरलेल्या आठ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी १५ मार्च रोजी करण्यात आली. शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने याकामी योगदान दिले. शासनाच्या दिशानिर्देशानुसार १४ मार्च रोजी वाशिम तालुक्यातील हिवरा रोहिला, खरोळा, मालेगाव तालुक्यातील दुधाळा, शिरसाळा आणि रिसोड तालुक्यातील अंचळ, केशवनगर या ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. तसेच १५ मार्च रोजी मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, लाठी, कारंजा तालुक्यातील धोत्रा जहागीर, काजळेश्‍वर आणि मानोरा तालुक्यातील जामदरा व अजनी या गावांची पाहणी करण्यात आली.

Web Title: Clean Village Village checkup villages!