क्वारंटिन कालावधी संपलेले नागरीक परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:09 IST2020-05-15T17:09:14+5:302020-05-15T17:09:30+5:30
१४ दिवसाचा कालावधी संपल्याने त्यांना आपआपल्या घरी आरोग्य तपासणी करुन पाठविण्यात आले.

क्वारंटिन कालावधी संपलेले नागरीक परतले घरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मुंबईवरून परतलेले नागरिकांना १४ दिवस क्वारंटिन करण्यात आले होते. त्यांचा १४ दिवसाचा कालावधी संपल्याने त्यांना आपआपल्या घरी आरोग्य तपासणी करुन पाठविण्यात आले.
मानोरा तालुक्यातील धानोरा घाडगे येथे मुंबईवरून चौदा नागरीक गावी परल्यानंतर त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवण्यात आले होते . गावचे पोलीस पाटील अमोल हागे, सरपंचा शोभा बबन आप्पा भगत यांनी १४ दिवस त्यांची व्यवस्था केली . तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी सुध्दा करण्यात आली . १४ दिवसानंतर त्यांचा क्वारंटिन कालावधी संपल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यांची प्रकृती व्यवस्थीत असल्याने त्याना आपल्या घरी पाठवण्यात आले . धानोरा घाडगे येथे शंभरच्यावर नागरीक परजिल्हयातून आले होते, त्यांना सुध्दा होम क्वारंटाईन करण्यात आले होते . त्यांचाही होम क्वारंटाईन कालावधी संपला आहे तर काहिंचा संपण्यावर आहे.