एसटीच्या अपघातात १० वर्षीय चिमुकला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:36+5:302021-09-24T04:48:36+5:30

वाशिम : भरधाव वेगातील एसटी बसने कट मारल्याने घडलेल्या अपघातात १० वर्षीय चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना ...

Chimukala, 10, was seriously injured in an ST accident | एसटीच्या अपघातात १० वर्षीय चिमुकला गंभीर

एसटीच्या अपघातात १० वर्षीय चिमुकला गंभीर

वाशिम : भरधाव वेगातील एसटी बसने कट मारल्याने घडलेल्या अपघातात १० वर्षीय चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना २२ सप्टेंबर रोजी कारंजा बायपास परिसरातील झाशी राणी चाैकात घडली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, शहरातील टेलिकाॅम काॅलनीतील रहिवासी योगेश आकोडे यांचा १० वर्षांचा मुलगा वेदांत हा झाशी राणी चाैकातून सायकलने शहरात येत असताना समोरून येणाऱ्या नागपूर आगाराच्या एम.एच. ४० ए.क्यू. ६४२३ क्रमांकाच्या एसटीने सायकलला कट मारला. यामुळे सायकलसह वेदांत आकोडे हा खाली पडला. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेनंतर एसटी चालकाने बस थेट कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.

Web Title: Chimukala, 10, was seriously injured in an ST accident