विहिरीत पडून मुलाचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:31 IST2017-10-04T02:31:01+5:302017-10-04T02:31:48+5:30

वाशिम:  मामाच्या घरी शिक्षणानिमित्त वास्तव्याला असलेल्या  शंकर ढवळे (वय १४) याचा विहिरीमध्ये तोल गेल्याने पाण्यात  बुडून मृत्यू झाला. ही घटना २ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाज तापूर्वी उघडकीस आली. 

The child dies due to the well! | विहिरीत पडून मुलाचा मृत्यू!

विहिरीत पडून मुलाचा मृत्यू!

ठळक मुद्देशिक्षणानिमित्त मामाच्या घरी राहत होतातोल गेल्याने पडला विहिरीत

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:  मामाच्या घरी शिक्षणानिमित्त वास्तव्याला असलेल्या  शंकर ढवळे (वय १४) याचा विहिरीमध्ये तोल गेल्याने पाण्यात  बुडून मृत्यू झाला. ही घटना २ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाज तापूर्वी उघडकीस आली. 
वाशिम तालुक्यातील वाळकी दोडकी येथील मूळ रहिवासी  असलेला शंकर ढवळे हा मोहजा (रोड) येथे आपल्या मामाच्या  घरी शिक्षणासाठी राहतो. २ ऑक्टोबरला शाळेला सुटी  असल्याने तो बकर्‍या राखण्यासाठी शेतामध्ये गेला होता. पाणी  पिण्यासाठी विहिरीवर गेला असता पाय घसरून तो विहिरीत  पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेची वाशिम ग्रामीण  पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेण्यात आली. 

Web Title: The child dies due to the well!