वीज मीटरमध्ये फेरफार; फौजदारी गुन्हा अन् १.४८ कोटींचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:04+5:302021-09-13T04:41:04+5:30

वाशिम : वीज वापरापोटी नियमानुसार दरमहा येणारे देयक अदा न करता वीज मीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. ...

Changes in electricity meters; Criminal offense and fine of Rs 1.48 crore! | वीज मीटरमध्ये फेरफार; फौजदारी गुन्हा अन् १.४८ कोटींचा दंड !

वीज मीटरमध्ये फेरफार; फौजदारी गुन्हा अन् १.४८ कोटींचा दंड !

वाशिम : वीज वापरापोटी नियमानुसार दरमहा येणारे देयक अदा न करता वीज मीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. मात्र, असे करणे धोकादायक ठरू शकते. वीज चोरी पकडली गेल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. दंड न भरल्यास फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वर्षभरात अशी ७७ प्रकरणे उघडकीस आली असून, १.४८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वीज मीटरमध्ये होणाऱ्या फेरफारचे प्रकार हाणून पाडण्यासाठी महावितरणमध्ये स्वतंत्ररीत्या भरारी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. कुठेही वीज चोरी होत असल्याचा सुगावा लागल्यास पथकातील कर्मचारी त्याठिकाणी धडक देऊन कुणाचीही गय न करता कारवाई करीत आहेत. वर्षभरात याअंतर्गत ७७ जणांची वीज चोरी पकडण्यात आली. त्यापैकी दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला; तर इतरांनी आकारलेली दंडाची रक्कम अदा केल्याची माहिती प्राप्त झाली.

..............

वीजचोरीसाठी अशीही चलाखी

१) वीजचोरी करताना संबंधित ग्राहक वीज मीटरशी छेडछाड करणे, मीटरमध्ये रिमोट कंट्रोल बसविणे, खांबावरून अथवा तारांवर आकोडे टाकून थेट वीजपुरवठा घेणे असे प्रकार अवलंबितात.

२) वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ग्राहकास दंडासह रक्कम भरावी लागते. दंड न भरल्यास पोलीस केस केली जाते. वीजचोरी करताना अपघात होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

.................

फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड

वीजमीटर ही महावितरणची मालमत्ता आहे. त्याच्याशी छेडछाड करणे हा कायद्याने अपराध आहे. असे असताना देयकात कपात व्हावी, या उद्देशातून काहीजण मीटरशी छेडछाड करून वीज चोरी करतात. हा प्रकार आढळल्यास फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड वसूल करण्याची कायद्यात तरतूद आहे.

...................

आठ महिन्यांत झालेली कारवाई

महिना ग्राहक वसूल दंड

जानेवारी९ १८ लाख

फेब्रुवारी १० १७ लाख

मार्च १४ २८ लाख

एप्रिल७ १५ लाख

मे १० १६ लाख

जून७ १५ लाख

जुलै १० १८ लाख

ऑगस्ट १० २१ लाख

................

कोट :

वाशिम शहरासह संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या वीजचोरीच्या प्रकरणांवर भरारी पथक विशेष लक्ष ठेवून आहे. गोपनीय माहिती मिळाल्यास तत्काळ कारवाई केली जाते. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.

- सतीश मोरे

अति. कार्यकारी अभियंता, भरारी पथक, वाशिम

Web Title: Changes in electricity meters; Criminal offense and fine of Rs 1.48 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.