आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

By Admin | Updated: August 15, 2014 02:08 IST2014-08-15T02:07:22+5:302014-08-15T02:08:19+5:30

वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्तारोको आंदोलन

Chakkjam movement for reservation | आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

वाशिम : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीकरिता समाजबांधवांच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी वाशिम शहरासह जिल्हाभरात चक्का जाम, रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. रास्ता रोकोमुळे काही वेळेसाठी वाहतुक ठप्प झाली होती.
वाशिम : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी वाशिम येथील पुसद नाका चौकात सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये स्थान मिळत नसल्याने समाजबांधवांवर अन्याय होत आहे. समाजाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळेसाठी पुसद, अमरावती, हिंगोली मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती किसनराव मस्के, बाळू मुरकुटे यांच्यासह समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
कारंजालाड : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीकरिता समाजाच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता स्थानिक भिलखेडा जवळील द्रूतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर जातीच्या समावेशासाठी भारतीय राज्यघटनेतील अनुसूचिमधील ३६ व्या क्रमांकावर नमुद असलेल्या बाबींची त्वरित अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय द्यावा या पार्श्‍वभूमिवर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सपूंर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कारंजा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी कारंजा भिलखेडा हायवेवरील चौफुलीवर रास्ता रोको केल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. या प्रसंगी सर्वांनी स्वत:हून अटक करवून घेतली. ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अढावू यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस स्टेशनमधून सर्वांची सुटका करण्यात आली.
मंगरुळपीर : धनगर समाजाचा अनुसुचीत जमातीत समावेश करावा या मागणीसाठी १४ ऑगस्ट रोजी सकाळी १0.५0 वाजता शेलूबाजार चौकातील औरंगाबाद ते नागपुर दृतगती मार्गावर परिसरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान मंगरूळपीर पोलीसांनी २0 कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडुन दिले. या दरम्यान सकाळपासुनच पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी राज्यभर धनगर समाजाचे वतीने आंदोलन सुरू आहे. तालुक्यात शेलूबाजार परिसरात बहुसंख्य धनगर समाज असल्याने औरंगाबाद ते नागपुर दृतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी जवळपास २00 ते २५0 समाजबांधव जमले होते. या दरम्यान सकाळ पासुनच बंदोबस्ताला आलेल्या मंगरूळपीर पोलीसांनी २0 कार्यकर्त्याना कलम ६८ अंर्तगत अटक करून सुटका केली. सुसाट वेगाने धावणार्‍या दृतगती मार्गावरील वाहतुक काही वेळेसाठी थांबली होती. पोलीसांनी अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन गावाबाहेरच हायवेची वाहतुक थांबवुन ठेवली होती. त्यामुळे कोणत्याच प्रकारची अनुचीत घटना घडली नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले.

Web Title: Chakkjam movement for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.