रिसोड येथे ‘चक्काजाम’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:42 IST2021-03-16T04:42:04+5:302021-03-16T04:42:04+5:30

रिसोड तालुक्यासह जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भूईमुंग व इतर पिकांची पेरणी केली आहे. सध्या हे पीक बहरले असतानाच वीज ...

Chakkajam warning at Risod | रिसोड येथे ‘चक्काजाम’चा इशारा

रिसोड येथे ‘चक्काजाम’चा इशारा

रिसोड तालुक्यासह जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भूईमुंग व इतर पिकांची पेरणी केली आहे. सध्या हे पीक बहरले असतानाच वीज वितरण कंपनीकडून कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडीत करणे सुरू आहे. परिणामी, पिके सुकत आहेत. हा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही, असे अॅड. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. १८ मार्चपर्यंत तोडलेले कनेक्शन न जोडल्यास चक्काजाम आंदोलनासह वीज मंडळाचे कार्यालय बंद करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा जन विकास आघाडीचे गटनेते स्वप्नील सरनाईक, रिसोड पंचायत समिती सभापती सुभाष खरात, नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, अॅड. कृष्णाजी आसनकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल पाटील भुतेकर, बाळासाहेब देशमुख, पुरुषोत्तम तहकीक, ओंकार सुरकुटे, पंचायत समिती सदस्य बबनराव हरीमकर, विष्णूपंत खाडे, भूषण पाटील दांदडे, संदीप धांडे, रवि आढाव, रवि बोंडे, गजानन वाघ, अशोकराव कुलाळ, परसराम वानखेडे, अश्रूजी नवले, नगर सेवक यशवंतराव देशमुख, पप्पीबाई कदम, नारायण गायकवाड, सलीम भाई, संगीता मोरे, झडपे, अकबर भाई, सागर डांगे, संदीप इरतकर, राजु इरतकर, अजीसभाई, दशरथ बोडखे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Chakkajam warning at Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.