शेतक-यांना अनुदानावर प्रमाणित हरभरा बियाणे उपलब्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 19:00 IST2017-10-23T18:59:57+5:302017-10-23T19:00:35+5:30

वाशिम :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी हंगामासाठी हरभ-याचे प्रमाणित बियाणे वितरण केले जाणार आहे. वाशिम  जिल्ह्यातील शेतक-यांना २ हेक्टर मर्यादेपर्यंत हरभरा बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सोमवारी दिली.

Certified gram seeds are available to farmers on subsidy! | शेतक-यांना अनुदानावर प्रमाणित हरभरा बियाणे उपलब्ध !

शेतक-यांना अनुदानावर प्रमाणित हरभरा बियाणे उपलब्ध !

ठळक मुद्देकृषी विभाग दोन हेक्टरची मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी हंगामासाठी हरभ-याचे प्रमाणित बियाणे वितरण केले जाणार आहे. वाशिम  जिल्ह्यातील शेतक-यांना २ हेक्टर मर्यादेपर्यंत हरभरा बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सोमवारी दिली.
शेतकºयांना अनुदानावर हरभरा बियाणे देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तालुका स्तरावरुन परवाना दिले जात आहेत. बºयाच शेतकºयांना पेरणी लवकर करावयाची असल्यामुळे कृषि विभागाकडून परवाना घेण्यास वेळ मिळत नसल्यास शेतकºयांनी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम किंवा कृभको यांच्या अधिकृत विक्रेत्याकडे आपला सातबारा उतारा व आधारकार्डची प्रत जमा करुन जास्तीत जास्त २ हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदानित हरभरा बियाणे घेवून जावे, असे आवाहन कृषी विभागाने केले.

Web Title: Certified gram seeds are available to farmers on subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती