शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईओं’च्या झाडाझडतीत अनियमितता उघड; ‘जल जीवन’च्या कंत्राटदारांना बजावणार नोटीस

By संतोष वानखडे | Updated: March 16, 2024 16:43 IST

या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली.

वाशिम :जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैभव वाघमारे यांनी घेतलेल्या झाडाझडतीत जल जीवन मिशनच्या काही कामांत अनियमितता झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी एका कंत्राटदाराला ४ लाख ३४ हजार ४०७ रुपयांचा दंड आकारला तर योजनेचे फलक न लावणाऱ्या व कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस बजावण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले. या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली.

प्रधान सचिवांमार्फत राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी जल जीवन मिशनच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या सभेत प्रधान सचिवांनी वाशिम जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी ६ मार्च रोजी जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांची एक बैठक घेऊन पाच ते दहा दिवसात सर्व कामे सुरू करणे, कामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावणे लावण्याबाबत निर्देश दिले होते. जल जीवन मिशनच्या कामामध्ये बांधकाम साहित्याचा दर्जा व पाईप लाईनची खोली याबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नसल्याचेही सीईओंनी स्पष्ट केले होते. या बैठकीनंतरही जल जीवन मिशनच्या कामात कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रगती झाली नसल्याचे समोर आल्याने सीईओ वाघमारे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून झाडाझडती सुरू केली. १५ मार्च रोजी वरदरी खुर्द आणि नागरतास (ता. मालेगाव) या दोन गावांतील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सविस्तर पाहणी केली. वरदरी खुर्द या गावासाठी ८९ लाख रुपयांची योजना मंजुर असुन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनियमितता झाल्याचे व दिलेल्या मानकानुसार काम केले नसल्याचे सीईओंच्या निदर्शनात आले.

कंत्राटदार  नितीन जाधव यांनी वरदरी खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची खोली ९० सीएम ऐवजी ४५ सीएम ठेवली. कार्यस्थळी ठेवण्यात आलेले साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. तसेच योजनेचा माहिती दर्शक फलक मानकानुसार चुकीचा लावला असून त्यावर कलर पेंटिंग ऐवजी रेडियमने अक्षरे लिहिलेली आढळली. या गंभीर बाबींची दखल घेत कंत्राटदाराला नोटीस बजावत चार लाख ३४ हजार ४०७ रुपयांचा दंडही ठोठावला. नागरतास या गावातील १.४८ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली असता पाण्याच्या टाकीच्या बॉटम स्लॅबचे बार उघडे असल्याचे तसेच टाकीच्या आवारातील पाईपलाईनचे काम अंदाज पत्रकानुसार केले नसल्याचे तसेच माहिती दर्शक फलक सुद्धा व्यवस्थित लावला नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे कंत्राटदार रवींद्र खडसे यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. फलक न लावणाऱ्या ६५ कंत्राटदारांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड तर कामे सुरू न करणाऱ्या ६२ कंत्राटदारांना प्रत्येकी १० हजारांचा दंड आकारण्याचे निर्देश  सीईओ वाघमारे यांनी दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद