मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:55 IST2021-02-20T05:55:45+5:302021-02-20T05:55:45+5:30
पेशकार यावेळी म्हणाले की, मोदी सरकारच्या २०२१-२२ च्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन, संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत ...

मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद
पेशकार यावेळी म्हणाले की, मोदी सरकारच्या २०२१-२२ च्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन, संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया देखील समाविष्ट करण्यात आला आहे. हा सर्वांचा आणि सर्वांसाठीचा अर्थसंकल्प आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. भारतालाही त्याचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, आर्थिक स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी, नवे कर लावणे स्वाभाविक होते. मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही, महागाई दर देखील ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे, मेट्रो, मालवाहतूक मार्गिका, बंदरे, विमानतळ अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र ७ लाख ५४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींविषयी यावेळी माहिती दिली.