शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

सेंट्रल बँकेने १०० हून अधिक शेतकऱ्यांना ठेवले कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 16:16 IST

शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थींची माहिती दडविली

ठळक मुद्देअनसिंगच्या सेंट्रल बँकेचा प्रतापशेतकºयांनी  केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे. शेतकºयाना दोन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्कअनसिंग :  आघाडी सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १०० पेक्षा अधिक शेतकºयांच्या कर्जमाफीची माहिती दडविल्याचा प्रकार सेंट्रल बँक  आॅफ इंडियाच्या अनसिंग येथील शाखेने केल्याचे उघडकीस आले आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या यादीत नाव न दिसल्याने शेतकºयांनी  केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे.  सेंट्रल बँके च्या अनसिंग येथील शाखेतून अनसिंग, पिंपळगाव, सोंडा, सापळी, उमरा कापसे, उमरा शमशोद्दीन, पार्डीआसरा व इतर गावातील शेकडो शेतकºयांनी हंगाम २०१५-१६ व त्यापूर्वी पिक कर्ज घेतले होते. या कर्जदार शेतकºयांनी नापिकीमुळे बँकेच्या पीक कर्जाचा भरणा केला नव्हता. दरम्यान, राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने २०१५ -१६ पूर्वी थकीत कर्जदार असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली; परंतु अनसिंग येथील सेंट्रल बँकेच्या अनसिंग येथील तत्कालीन व विद्यमान शाखा व्यवस्थापक  व बँकेतील कर्मचाºयांनी या योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या १०० पेक्षा जास्त शेतकºयांना या बाबत कोणतीच माहिती दिली नाही. आता राज्यातील विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत दोन लाख रुपये पर्यंतचे थकित कृषीकर्ज असलेल्या शेतकºयांसाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अमलात आणली. या योजनेच्या यादीत काही शेतकºयांना आपले नाव दिसले नाही. त्यावेळी अनसिंग येथील रहिवासी महिला शेतकरी सारिका विजय गट्टाणी यांनी चौकशी केली. तेव्हा तुमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत असल्यांचे सांगत आता तुम्ही थकीत व्याजाची रक्कम भरण्याचा असा सल्ला शाखा व्यवस्थापकांनी दिला. त्यावरून शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.   दोन वर्षांच्या व्याजाचा नाहक भुर्दंडअनसिंग येथील सारिका गट्टाणी यांच्यासह सापळी येथील तात्याराव रायाजी ढगे, भगवान तात्याराव ढगे व इतर  शेतकºयांनाही सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी थकित व्याजाची रक्कम भरण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकारामुळे अनसिंग व परिसरातील १०० पेक्षा जास्त शेतकºयाना दोन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. तसेच हे सर्व शेतकरी आधीची कर्जमाफी होऊनही हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मध्ये नवीन पिक कर्जापासून वंचित राहिलेत.  

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र असलेल्या सर्वच शेतकºयांना त्याची माहिती आणि लाभही देण्यात आला आहे. शासन निर्णयानुसारच कर्जमाफीची यादी जाहीर झाली होती. काही शेतकºयांचा याबाबत गैरसमज झाला आहे. ते शेतकरी सध्याच्या कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरतात. त्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. -गणेश जाधव, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, अनसिंग

मी २०१५-१६ मध्ये १ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०१७ रोजी तत्कालीन शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १ लाख ५ हजार ५७० रुपये कर्जमाफी झाली होती. त्याबाबतचा एसएमएसही आला होता. त्यावेळी २ हजार ९१२ रुपये व्याजाची रक्कम भरावी लागणार होती. त्यामुळे मी वारंवार सेंट्रल बँकेच्या शाखेशी संपर्कही केला; परंतु तुम्हाला कर्जमाफी मिळाली नसल्याचे शाखाधिकाºयांनी सांगितले होते. -नंदकिशोर नारायण कापसे,शेतकरी, उमरा कापसे

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी