अहिल्यादेवी जयंती घरातच साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST2021-05-29T04:29:56+5:302021-05-29T04:29:56+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण देशभर खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण, मागील वर्षापासून आपल्या देशावर ...

Celebrate Ahilya Devi Jayanti at home | अहिल्यादेवी जयंती घरातच साजरी करा

अहिल्यादेवी जयंती घरातच साजरी करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण देशभर खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण, मागील वर्षापासून आपल्या देशावर कोरोना विषाणू संसर्ग असल्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरांत परिवारासोबत साजरी करायची असून, प्रत्येकाने किमान एक झाड तरी आपल्या आजूबाजूच्या परिसरात लावावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी योगेश नप्ते पाटील यांनी समाजबांधवांना केले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून कार्यक्रम न घेता आपल्या घरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर व यशवंतराव होळकर यांचा इतिहास या जयंतीनिमित्त आपल्या परिवारासह वाचावा, तसेच किमान एक झाड तरी आपल्या परिसरात लावावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करून जयंती साजरी करावी, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी योगेश नप्ते-पाटील यांनी समाज बांधवांना प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

Web Title: Celebrate Ahilya Devi Jayanti at home