नागरिकांच्या सतर्कतेने सिलिंडरमधून गॅसची चोरी उघड

By Admin | Updated: August 9, 2014 01:19 IST2014-08-09T01:11:24+5:302014-08-09T01:19:49+5:30

वाशिम येथील काळे फैलातील घटना : दोघांविरूद्ध कारवाई.

The cauterization of the gas stolen from the cylinders of the public | नागरिकांच्या सतर्कतेने सिलिंडरमधून गॅसची चोरी उघड

नागरिकांच्या सतर्कतेने सिलिंडरमधून गॅसची चोरी उघड

वाशिम : ग्राहकाला घरपोच सिलिंडरची पोच देण्याचे काम करणारा ऑटोचालक व त्याच्या एका साथीदाराला सिलिंडरमधून गॅसची चोरी करताना नागरिकांनी रंगेहात पकडले. ही घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
येथील मिलिंद गॅस एजन्सी मार्फत ग्राहकांना सिलिंडरची घरपोच सुविधा देण्यासाठी मांगीलाल बिश्नोई नावाच्या युवकाला खासगी वाहनाद्वारे कंत्राट दिले होते. मांगीलाल व त्याचा एक साथीदार मनोज बिश्नोई (दोघेही रा. राजस्थान ह.मु. वाशिम) यांनी वाहनामध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये एका लोखंडी नळीद्वारे गॅस चोरी करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. त्यांचा हा गोरखधंदा वाहनामध्येच बसून चालत होता. आज ८ ऑगस्ट रोजी काळे फैल येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा गोरखधंदा उघडकीस आला. नागरिकांनी मांगीलाल व त्याचा एक साथीदार या दोघांनाही रिकाम्या सिलिंडरमध्ये नळीद्वारे गॅस भरताना रंगेहात पकडले; मात्र मांगीलालचा साथीदार घटनास्थळाहून पसार होण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती नागरिकांनी मिलिंद गॅस एजन्सीचे संचालक माणिकराव सोनोने व वाशिम शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सिलिंडर २४ गॅस सिलिंडरने भरलेला ऑटो जप्त करून केला. या घटनेची गॅस एजन्सीचे संचालक माणिकराव सोनोने यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. या फिर्यादीहून पोलिसांनी मांगिलाल बिश्नोई व मनोज बिश्नोई यांच्याविरूद्ध भादंविचे कलम ४२0, ४0६, ४८९, २८५, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: The cauterization of the gas stolen from the cylinders of the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.