कृषी विज्ञान केंद्र वाशिमद्वारे गाजरगवत निर्मूलन जागृती सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST2021-08-21T04:46:55+5:302021-08-21T04:46:55+5:30
कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर गाजर गवताचे निर्मूलन, गाजर गवतासंदर्भात माहिती देऊन शेतकरी व युवकांमध्ये जनजागृती करणे या ...

कृषी विज्ञान केंद्र वाशिमद्वारे गाजरगवत निर्मूलन जागृती सप्ताह
कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर गाजर गवताचे निर्मूलन, गाजर गवतासंदर्भात माहिती देऊन शेतकरी व युवकांमध्ये जनजागृती करणे या उद्देशाने प्रशिक्षण व सामुदायिक गाजरगवताचे निर्मूलन हे कार्यक्रम घेण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ, तज्ज्ञ कर्मचारी, तसेच कृषी महाविद्यालय, रिसोड, कृषितंत्रनिकेतनचे प्राध्यापक, ग्रामीण कृषी कार्यानुभव तसेच कृषी पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यात सहभागी झाले. गाजरगवत निर्मूलन सप्ताहांतर्गत ऑनलाइन प्रशिक्षणात गाजर गवताच्या उगम, जागतिक प्रसार, वाढ वैशिष्ट्य, जैविक नियंत्रण व त्याचे उपयोग यासंदर्भात टी.एस. देशमुख कृषी विद्यातज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांनी विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान कृषी महाविद्यालयाचे समन्वयक आर.एस. डवरे यांनी सामुदायिक जागरूकतेसाठी विद्यार्थ्यांनी गाजर गवत निर्मूलन या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
---------
जिल्हाभरात विविध ठिकाणी उपक्रम
गाजर गवत निर्मूलन सप्ताहांतर्गत कृषी विज्ञान केंद्र वाशिम, कृषी महाविद्यालय, रिसोड व ऋषिवट शेतकरी उत्पादक कंपनी करडा यांच्या माध्यमातून प्रक्षेत्र, तसेच कार्यक्षेत्रातील गावांसह इतर गावांतही गाजर गवत जनजागृती सप्ताह, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.