कार्लीच्या महिलांची पोलिसस्टेशनवर धडक
By Admin | Updated: June 28, 2014 01:41 IST2014-06-28T01:10:48+5:302014-06-28T01:41:04+5:30
गावठी दारूची अवैध विक्री ताबडतोब बंद करावी या मागणीसाठी ठाणेदारांना निवेदन.

कार्लीच्या महिलांची पोलिसस्टेशनवर धडक
तळप बु. : कार्ली येथे मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या गावठी दारूचे गाळप होत असून, त्यामुळे गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. करिता गावठी दारूची अवैध विक्री ताबडतोब बंद करावी या मागणीसाठी २७ जून रोजी महिलांनी मानोरा पोलीस स्टेशनवर धडक दिली व ठाणेदारांना निवेदन दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष सुजाता शेरे यांच्या पुढाकाराने महिलांचे एकत्रीकरण झाले व ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. दारूमुळे गावात थोड्या थोड्या कारणामुळे भांडणे होत आहेत. गावात तंटामुक्त समिती आहे पण त्या निष्क्रिय ठरत आहे. समिती आणि जमादारही याकडे दुर्लक्ष करीत आहे असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.