शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचा फंडा, तिळगुळ घ्या अन् मतदान करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

वाशिम जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार, १५ जानेवारीला मतदान होणार. या मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येलाच मकर संक्रांतीचा योग आला. ...

वाशिम जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार, १५ जानेवारीला मतदान होणार. या मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येलाच मकर संक्रांतीचा योग आला. प्रचार कार्यावर मर्यादा आल्या असल्या तरी उमेदवारांना तोंडी प्रचार करण्याची मुभा असल्याने मकर संक्रांतीच्या योगाचा उमेदवारांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसले. निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या काही उमेदवारांनी तिळगुळाची पाकिटे तयार करून ती मतपत्रिकेसोबत वाटली. अर्थात यावेळी कोणीही तिळगुळ घ्या अन्‌ मतदान करा, असा शब्दप्रयोग केल्याचे दिसले नाही. तथापि, या चित्रातून मात्र सर्वत्र अर्थबोध तसाच निघत होता. उमेदवारांच्या या उपक्रमामुळे मतदारांची संक्रांत मात्र गोड झाली. तिळगुळाचे दर गगनाला भिडले असताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारादरम्यान उमेदवारांनी वाटलेल्या तिळगुळामुळे घराघरात तिळगुळाचा गोडवाही निर्माण झाला होता.

-----------------

उत्सवाची परंपरा जपण्याचीही संधी

मकर संक्रांतीच्या उत्सवात घरोघरी तिळगुळ तयार करून ते वाटले जाते. एकमेकांना तिळगुळ वाटत ऋणानुबंध घट्ट करण्याचा प्रयत्न महिला मंडळीकडून या सणात केला जातो. वाढत्या महागाईमुळे यावर मर्यादा आल्या असताना उमेदवारांना मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने ही परंपरा जपण्याची संधीच मिळाल्याचे दिसून आले.

===Photopath===

140121\14wsm_3_14012021_35.jpg

===Caption===

उमेदवारांचा फंडा, तीळगुळ घ्या अन् मतदान करा !