कोरोना चाचणीसाठी उमेदवार, प्रतिनिधींची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:22+5:302021-01-13T05:45:22+5:30
------------- सर्पमित्रांकडून दोन सापांना जीवदान वाशिम: निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी मंगळवार १२ जानेवारी रोजी विविध ठिकाणी आढळलेल्या तीन ...

कोरोना चाचणीसाठी उमेदवार, प्रतिनिधींची झुंबड
-------------
सर्पमित्रांकडून दोन सापांना जीवदान
वाशिम: निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी मंगळवार १२ जानेवारी रोजी विविध ठिकाणी आढळलेल्या तीन सापांना पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. त्यात शेलूबाजर येथे एका घरात आढळलेल्या सापासह मंगरुळपीर शहरात दोन ठिकाणी आढळलेल्या सापांचा समावेश होता. सुबोध साठे, शुभम ठाकूर, आदित्य इंगोले, सौरव इंगोले आदि सर्पमित्रांनी हे साप पकडले.
-----------------
जळलेल्या तुरीपोटी मदतीची प्रतीक्षा
इंझोरी: येथून जवळच असलेल्या तोरणाळा घोटी येथील शेतकरी भीमराव राठोड यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला २५ डिसेंबर रोजी आग लागल्याने १५ क्विंटल तूर जळून खाक झाली. या घटनेचा तलाठ्यांनी पंचनामाही केला; परंतु २० उलटत आले तरी, या प्रकरणी कोणतीच कार्यवाही प्रशासनाने केली नसून, या शेतकऱ्याला मदतीची प्रतीक्षा लागली आहे.
-------
कारंजात ६५०० क्विंटल सोयाबीन आवक
कारंजा: तालुक्यात अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेतकरी तुरीच्या काढणीत व्यस्त आहेत. त्यामुळे बाजार समितीमधील आवक कमी झाली असून, सोमवारी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ ६५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
-------
===Photopath===
120121\12wsm_5_12012021_35.jpg
===Caption===
कोरोना चाचणीसाठी उमेदवार, प्रतिनिधींची झुंबड