वाशिम जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतची पोटनिवडणूक २३ जून रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 16:37 IST2019-06-18T16:37:09+5:302019-06-18T16:37:14+5:30
सार्वत्रिक निवडणूक व थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाºया रिक्त सरपंच, सदस्य पदासाठी ३३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक २३ जून २०१९ रोजी होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतची पोटनिवडणूक २३ जून रोजी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक व थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाºया रिक्त सरपंच, सदस्य पदासाठी ३३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक २३ जून २०१९ रोजी होत आहे. या निवडणूक कालावधीमध्ये सार्वजनिक शांतता, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान होणार आहे, तेथे २२ व २३ जून २०१९ रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी मंगळवारी दिले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी २४ जून २०१९ रोजी होणार असून यादिवशी मतमोजणी होत असलेल्या स्थानिक क्षेत्रात मतमोजणी सुरु झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचेही आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.