लोणी बु. येथे समता फाउंडेशनतर्फे लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST2021-07-21T04:27:05+5:302021-07-21T04:27:05+5:30
लोणी बु. येथे समता फाउंडेशनच्या वतीने संतोष वाघमारे यांच्या सहकार्यातून कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सूरज ...

लोणी बु. येथे समता फाउंडेशनतर्फे लसीकरण शिबिर
लोणी बु. येथे समता फाउंडेशनच्या वतीने संतोष वाघमारे यांच्या सहकार्यातून कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सूरज गुप्ता यांच्यासह समता फाउंडेशनचा चमू लोणी बु.मध्ये दाखल झाला. सकाळी ८:३० वाजता लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरणासोबत प्रत्येक नागरिकास मास्क मोफत देण्यात आले. लसीकरण शिबिर यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, जि.प. शाळा शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविकांचे सहकार्य लाभले.
-------------------
नागरिकांचा प्रतिसाद
गावातील नागरिकांचा लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लसीकरणासाठी ग्रा.पं. सदस्य विनोद पाटील बोडखे यांनी समता फाउंडेशनशी समन्वय साधून शिबिराचे आयोजन केले. यामध्ये १८ वर्षांवरील नागरिकांना प्रथम डोस देण्यात आला. दुपारी ४ वाजेपर्यंत जवळपास ६५५ हून अधिक महिला पुरुषांचे लसीकरण करण्यात आले.
200721\20wsm_1_20072021_35.jpg
गावातील नागरिकांचा लसीकरण शिबिरास प्रतिसाद