कार्ली येथे चार एकरांतील गहू जळून खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST2021-03-04T05:17:36+5:302021-03-04T05:17:36+5:30

गट क्रमांक १६२ मधील चार एकर शेतातील गहू पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप सखूबाई मार्गे यांनी केला. कडाक्याचे ऊन, ...

Burn four acres of wheat at Carly! | कार्ली येथे चार एकरांतील गहू जळून खाक !

कार्ली येथे चार एकरांतील गहू जळून खाक !

गट क्रमांक १६२ मधील चार एकर शेतातील गहू पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप सखूबाई मार्गे यांनी केला. कडाक्याचे ऊन, हवा आणि वाळलेला गहू यामुळे क्षणार्धात आग शेतात पसरली. गावातील युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चार एकरातील गहू जळून खाक झाला. विद्युत तारा लोंबकळलेल्या असून, यासंदर्भात महावितरणला वारंवार माहिती दिली. परंतु, याची दखल न घेतल्याने शेवटी या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन गव्हाचे नुकसान झाल्याचा आरोप महिला शेतकऱ्याने केला. घटनेची माहिती मिळताच तलाठी आकाश राठोड, कृषी सहायक नितीन वाडेकर, ग्रामपंचायत सचिव राजू शेळके, महावितरणचे शाखा अभियंता अमोल नवरे, लाइनमन राहुल देशमुख, सरपंच गोविंदा पाटील, पोलीसपाटील प्रभाकर लाहे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव मार्गे, यांच्यासह मान्यवरांनी घटनास्थळाची पाहणी केली. नुकसानभरपाई देण्याची मागणी सखूबाई मार्गे यांनी केली.

Web Title: Burn four acres of wheat at Carly!