अडोळी येथे तीन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 18:08 IST2019-11-29T18:08:18+5:302019-11-29T18:08:45+5:30
एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अडोळी येथे तीन ठिकाणी घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी यैथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची धटना २९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अडोळी येथील भिमराव तायडे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यावेळी रोख २४ हजार ५०० रुपये व अन्य साहित्य लंपास केले. घरातील कपाटासह दरवाजाची तोडफोड केली. यानंतर अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा गावातीलच सुरेश इढोळे व ज्ञानबा इढोळे यांच्या घराकडे वळविला. या दोघांच्या घरातूनही ५० हजारापेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.