कोरोना संसर्गाच्या काळात बुलडाण्याचा पुत्र वाचवतोय मुंबईकरांचे प्राण!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:03 PM2020-11-09T16:03:57+5:302020-11-09T16:04:04+5:30

Buldhana News डॉ.सोपान पाटील असून अविरतपणे सेवा देत आहेत. 

Buldana's son saves life of corona patients in Mumbai! | कोरोना संसर्गाच्या काळात बुलडाण्याचा पुत्र वाचवतोय मुंबईकरांचे प्राण!  

कोरोना संसर्गाच्या काळात बुलडाण्याचा पुत्र वाचवतोय मुंबईकरांचे प्राण!  

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील डॉ.सोपान गजानन पाटील या शेतकरी कुटुंबातील सुपूत्राने अत्यंत मेहनतीने मुंबईच्या नामांकित मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. आज कोरोनाच्या संकट काळात मुंबईच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी गेली कित्येक महिने रात्रंदिवस काम करत आहे. 
महाराष्ट्र सरकारने मुंबईत वुहानच्या धर्तीवर बीकेसीच्या मैदानात २ हजार बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटलची उभारणी केली. परंतू हॉस्पिटल चालवण्याचा कोणाला अनुभव नव्हता किंवा कोणी डॉक्टर इथे काम करायला तयारही नव्हते, तेव्हा हे इंद्रधनुष्य पेलण्यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये एफएमटी डिपार्टमेंट चे हेड असलेले डॉ.राजेश डेरे हे पुढे आले. डॉ.डेरे यांनी त्यांच्याच हाताखाली डॉक्टर झालेले आणि सोबत काम करत असलेले ५ नवखे डॉक्टर विद्यार्थी सोबत घेतले आणि त्या ५ पैकी एक डॉ.सोपान पाटील असून अविरतपणे सेवा देत आहेत. 
डॉ.डेरे यांच्या नेतृत्वात नवख्या पाच डॉक्टरांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मुंबईत कोरोना नियंत्रणात येण्यास यश आले आहे. या हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत १० हजार पेक्षा अधिक कोरोना रूग्ण बरे झाले असून एकही रूग्ण दगावलेला नाही.  या रूग्णालयातील सेवा मानसिक आणि शारीरिकरित्या फार कठीण व थकवणारी होती. याकाळात डॉ.सोपान यांचे सुमारे ८ किलो वजन देखील कमी झाले आहे. डॉक्टरी पेशाचं भान आणि काळाची गरज या दोन्हींमुळे मागे हटण्याचा कधीच विचार आला नाही. ‘आम्ही नाही तर कोण..?’ याच उत्तर आम्हीच असं होतं असे डॉ.सोपान सांगतात. 
कोरोना संसर्ग होऊ शकतो याची भीती कधीच वाटली नाही. घरी येण्याच्या बेतात असतानाच ही जबाबदारी स्विकारल्याने डॉ.सोपान हे सुमारे १६ महिन्यांपासून कुटूबासून दूर आहेत. डॉ.सोपान यांचे काम हे संपूर्ण हॉस्पिटलला लागणारे औषधे व इतर वस्तूंचे नियोजन मुंबई मधील ईतर कोविड हॉस्पिटल सोबत समन्वयाचे आहे.   ६ महिन्यांपासून एकही दिवस सुट्टी न घेता दररोज १४ ते १५ तास काम करत असल्याने जिल्ह्यातील या सुपूत्राच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Web Title: Buldana's son saves life of corona patients in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.