बिएसएनएल सेवा आठ दिवसापासून बंद
By Admin | Updated: July 24, 2014 23:07 IST2014-07-24T23:07:59+5:302014-07-24T23:07:59+5:30
अनसिंग येथे गेल्या आठ दिवसांपासून सेवा बंद असल्यामुळे एकमेकापासून संपर्क तुटला असून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

बिएसएनएल सेवा आठ दिवसापासून बंद
अनसिंग : येथे गेल्या दोन वर्षापासून बि.एस.एन.एल. च्या सेवेकडे या विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील सेवा नेहमीच विस्कळीत राहते. गत आठ दिवसांपासून सदर सेवा बंद असल्यामुळे येथील ग्राहकांना एकमेकापासून संपर्क तुटला असून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
या ठिकाणी बि.एस.एन.एल. चे भव्य कार्यालय आहे परंतु त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांचा तुटवडा असून एकच कर्मचारी या ठिकाणचा कारभार पाहतो. या ठिकाणी ग्राहकांच्या संख्या हजारोंच्या वर आहे तसेच बँकेचे व्यवहार ऑनलाईन झाल्यामुळे सदर सेवा सुरळीत असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून या कार्यालयाकडे वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील बॅटरीक पुर्णपणे खराब झाल्या आहेत. तसेच विद्युत पुरवठा खंडित झाला की त्यांची सेवा बंद पडते. त्यामुळे लोकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. येथील १६ जुलै प ासून सेवा पुर्ण पणे खंडीत असल्यामुळे लोकांचा संपर्क तुटला आहे. तसेच इंटरनेट बंद असल्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत तक्रार करण्यासाठी येथील कार्यालयात कुणीही कर्मचारी वेळेवर सापडत नाहीत तसेच याबाबत वाशिम कार्यालयात अनसिंगचे सरपंच चिंतामण लांडगे, जगदीश राजे तथा ग्राहकांनी संपर्क केला असता येथील अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देवून ग्राहकांचे समाधान करण्याऐवजी त्यांना आमची सेवा बंद करुन टाका अशा भाषेत उत्तरे देत आहेत. त्यामुळे येथील ग्राहक त्रस्त झाले आहेत. सदर विस्कळीत सेवा नियमित न झाल्यास सर्व ग्राहक आपली सेवा बंद करणार असल्याचे सरपंच चिंतामण लांडगे, जगदीश राजे, किशोर सारडा, यांच्यासह इतर ग्राहकांनी इशारा दिला आहे.