पायी चालण्याची सवय मोडली; गुडघा-कंबरदुखी मागे लागली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:32+5:302021-09-24T04:48:32+5:30

वाशिम : दीर्घायुष्य मिळवायचे असेल तर निरोगी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी दैनंदिन योगासन, प्राणायामसोबतच पायी चालण्याची सवय असायला हवी; ...

Broke the habit of walking; Knee-lumbar pain receded! | पायी चालण्याची सवय मोडली; गुडघा-कंबरदुखी मागे लागली !

पायी चालण्याची सवय मोडली; गुडघा-कंबरदुखी मागे लागली !

वाशिम : दीर्घायुष्य मिळवायचे असेल तर निरोगी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी दैनंदिन योगासन, प्राणायामसोबतच पायी चालण्याची सवय असायला हवी; मात्र सध्या विविध कारणांमुळे अनेकांची ही सवय मोडली आहे. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. कमी वयातच गुडघा, कंबरदुखी यासह विविध प्रकारचे आजार यामुळे बळावत चालल्याचा सूर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमधून उमटत आहे.

................

या कारणांसाठीच होतेय चालणे

ज्येष्ठ -व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ

महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षामिळेपर्यंत

पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली

तरुणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत

................

बॉक्स...

म्हणून वाढले हाडांचे आजार

पूर्वी वाहनांची संख्या मर्यादित होती. त्यामुळे व्यायाम म्हणून नव्हे; तर कामानिमित्त प्रत्येकाला पायी चालावे लागत असे. आता थोड्याथोडक्या अंतरासाठीही वाहनाचा वापर केला जातो. पायी चालण्याची सवय मोडल्याने पाठदुखी, कंबरदुखी, गुडघादुखीचा त्रास बळावत आहे. अशा रुग्णांच्या संख्येत हल्ली वाढ झालेली आहे.

- डॉ. सचिन कड

..............

(पॉईंटर्स)

हे करून पाहा

एक किमी परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा

कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या

घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा

.............

ज्यांना पायी चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी...

तळपाय, गुडघा, कंबर, पाठ आदी अवयवायांमध्ये आधीपासूनच व्याधी असेल तर अशा लोकांना पायी चालणे शक्य होत नाही. संबंधितांनी झेपावेल तितका वेळ योगासने, प्राणायाम करून आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, अशी माहिती डॉ. हरीश बाहेती यांनी दिली.

Web Title: Broke the habit of walking; Knee-lumbar pain receded!