‘लाचलुचपत प्रतिबंधक’ला मिळेना चौकशीची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST2021-02-13T04:40:04+5:302021-02-13T04:40:04+5:30

वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या दोन वर्षांत ग्रामविकास विभागाशी संबंधित दोन आणि नगर विकास विभागाशी संबंधित एक अशा तीन ...

‘Bribery Prevention’ does not get permission to investigate | ‘लाचलुचपत प्रतिबंधक’ला मिळेना चौकशीची परवानगी

‘लाचलुचपत प्रतिबंधक’ला मिळेना चौकशीची परवानगी

वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या दोन वर्षांत ग्रामविकास विभागाशी संबंधित दोन आणि नगर विकास विभागाशी संबंधित एक अशा तीन तक्रारी प्राप्त झाल्या. संबंधित विभागांमधील ठराविक कर्मचाऱ्यांनी योजनांतर्गत कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याची ही प्रकरणे आहेत. दरम्यान, २०१८ मध्ये कायद्यात झालेल्या सुधारणांनुसार लाचलुचपत विभागाने त्या-त्या विभागातील खातेप्रमुखांकडे कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याकरिता परवानगी मागितली आहे; मात्र ती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे चौकशी प्रलंबित आहे.

..................

०३

२०१९-२०२० या दोन वर्षांत चौकशी परवानगीसाठी केले अर्ज

००

परवानगी मिळालेले अर्ज

०३

प्रलंबित प्रकरणे

............

ग्रामविकास विभागाची दोन प्रकरणे

वाशिम येथील लाचलुचपत विभागाकडे ग्रामविकास आणि नगर विकास विभागाशी संबंधित कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराबाबतची एकूण तीन प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे; मात्र खातेप्रमुखांची परवानगीच मिळाली नसल्याने चौकशीसत्र पुढे सरकू शकले नाही.

........

कोट :

वाशिम येथील लाचलुचपत विभागाकडून गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. त्यातील दोषींना शिक्षादेखील झालेली आहे; मात्र २०१९ व २०२० मध्ये दाखल तक्रारींमध्ये संबंधित खातेप्रमुखांनी चौकशीची परवानगी दिली नसल्याने केवळ तीन प्रकरणे प्रलंबित आहेत.

- निवृत्ती बोराडे

लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी, वाशिम

Web Title: ‘Bribery Prevention’ does not get permission to investigate