लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !
By Admin | Updated: February 17, 2017 20:35 IST2017-02-17T20:35:25+5:302017-02-17T20:35:25+5:30
येथील एका इसमास प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी हव्या असलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाच मागून

लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !
>ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड (जि.वाशिम), दि. 17 - येथील एका इसमास प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी हव्या असलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाच मागून २.५ हजार रुपये स्विकारताना काळी कारंजा येथील ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने शुक्रवार, १७ फेब्रूवारीला रंगेहात अटक केली.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, जनऔषधी केंद्रासाठी लागणाºया नाहरकत प्रमाणपत्राकरिता ग्रामसेवक सुरेश गांजरे यांनी ५५० रुपये टॅक्स भरण्यासोबतच ५ हजार रुपये वेगळे द्यावे लागतात, असे आपणास काळी कारंजा येथे कार्यरत ग्रामसेवक सुरेश गांजरे यांनी सांगितल्याची कैफियत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे नोंदविली. त्यावरून लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारदार आणि मंगरुळपिर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन पंचांना सोबत घेऊन सापळा रचला. यादरम्यान कारंजा येथील एका खासगी कार्यालयात ग्रामसेवक गांजरे याच्या सांगण्यावरून तक्रारदाराने शिपाई गणेश तरासे याच्याकडे २.५ हजार रुपये दिले. यावेळी तेथे दबा धरून असलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने गांजरे आणि तरासे या दोघांनाही जेरबंद करून कारंजा शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ७,१२,१३(१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.