जऊळक्यात कला दिग्दर्शकाच्या निवासस्थानी धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:15+5:302021-09-13T04:41:15+5:30
लिलाधर सावंत यांची पत्नी पुष्पा सावंत यांनी जऊळका पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, १२ सप्टेंबर रोजी ...

जऊळक्यात कला दिग्दर्शकाच्या निवासस्थानी धाडसी चोरी
लिलाधर सावंत यांची पत्नी पुष्पा सावंत यांनी जऊळका पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, १२ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठून लघुशंका करायला जात असताना, घराच्या मागच्या दरवाजाची कडी तुटलेली असल्याचे लक्षात आले. स्वयंपाकघरात जाऊन पाहिले असता, डायनिंग टेबलवर ठेवून असलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने व कागदात गुंडाळून ठेवलेले रोख १५ हजार रुपये असा एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे निदर्शनास आले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून जऊळका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोरे, पोलीस कर्मचारी सचिन कल्ले, काळदाते, आगळे, रगडे, इंगोले करीत आहेत.
..................
इंचलवार यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न
लिलाधर सावंत यांच्या शेजारी राहणारे दिनेश इंचलवार यांच्या घरीही १२ सप्टेंबरच्या पहाटे चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी ठरला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
.............
घटनास्थळाहून धारदार कुऱ्हाड जप्त
जउळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घटनास्थळी मिळून आलेली धारदार कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करून पाहणी करण्यात आली.