एकाच रात्री ७ ठिकाणी धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:46+5:302021-09-11T04:42:46+5:30
९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेलगाव राजगुरे येथील दीपक आत्माराम वाघ यांच्या घरातून एलसीडी, मिक्सरसह १६ हजारांचा ...

एकाच रात्री ७ ठिकाणी धाडसी चोरी
९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेलगाव राजगुरे येथील दीपक आत्माराम वाघ यांच्या घरातून एलसीडी, मिक्सरसह १६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यांचेच चुलत भाऊ संतोष वाघ यांची एम.एच. ३७ एच ०६०७ क्रमांकाची मोटारसायकल, रामदास वाघ यांच्या घरातून १० हजारांची रोख व १५०० रुपयांच्या इतर वस्तू, संदीप वाकळे यांच्या घरातून दोन हजार रुपये रोख, तिवळी शेत शिवारातून सुभाष लादे यांची एम.एच. ३७ एस ०८२६ क्रमांकाची मोटारसायकल, दुधाळा येथील विलास काळे यांची एम.एच. ३७ पी ३५०८ क्रमांकाची मोटारसायकल, मसलापेन येथील दुकानातून दोन हजार रुपये रोख व केशकर्तनालयातील साहित्य चोरट्यांनी चोरून नेले.
दीपक आत्माराम वाघ यांच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दामोदर इप्पर करीत आहेत. एकाच रात्री सात ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमक्ष उभे ठाकले आहे.