शिरपूर परिसरातील विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 19:06 IST2017-12-03T19:01:21+5:302017-12-03T19:06:23+5:30
मुलगी वैष्णवी गणेश पवार हिचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार २ डिसेंबरला शिरपूर पोलिसांत दाखल झाली होती.

शिरपूर परिसरातील विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: अज्ञात व्यक्तीने मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार २ डिसेंबरला शिरपूर पोलिसांत दाखल झाली. त्याच प्रकरणातील मुलगी वैष्णवी गणेश पवार हिचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वैष्णवी २ डिसेंबरला पहाटे ४.३० च्या सुमारास बाहेर शौचास गेली होती. मात्र, उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी त्याचदिशी सायंकाळी ७ वाजता आपल्या मुलीस कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची तक्रार शिरपूर पोलिसांत दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, परिसरातील शेतकरी बाविस्कर हे पिकांना पाणी देत असताना त्यांच्या विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने मुलीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हरीश गवळी, सहायक पोलिस निरीक्षक संजय शिपणे, पोलिस उपनिरीक्षक गणेश मुपडे, बबन खिल्लारे, रामेश्वर जोगदंड आदिंनी घटनास्थळी धाव घेवून विश्वास गायके, विशाल वानखेडे यांच्यासह इतर नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तो मृतदेह वैष्णवीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगावच्या रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपाास शिरपूर पोलिस करित आहेत.