इंझोरी येथे आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST2021-07-05T04:25:37+5:302021-07-05T04:25:37+5:30

या शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहारचे प्रा. ओम बलोदे, श्याम पवार, राम ढाकुलकर, इंझोरी शाखा ...

Blood donation camp today at Injori | इंझोरी येथे आज रक्तदान शिबिर

इंझोरी येथे आज रक्तदान शिबिर

या शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहारचे प्रा. ओम बलोदे, श्याम पवार, राम ढाकुलकर, इंझोरी शाखा प्रमुख प्रमोद घोडे, राजकुमार दिघडे, नीलेश डोळस, अंकित हळदे, कुणाल शिंदे, माणिक डेरे, नरेश आसावा, अमोल भुयार आदींनी केले.

००००

रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराची गरज आहे. ही गरज ओळखून ‘लोकमत’ व प्रहारच्यावतीने इंझोरी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले असून, यामध्ये अधिकाधिक संख्येने युवकांसह नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

- प्रमोद घोडे,

सर्कल प्रमुख प्रहार

.......

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. गरजूंचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करणे ही काळाची गरज ठरत आहे. इंझोरी येथे सामाजिक बांधीलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन असून, यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून रक्ताचे नाते जोपासावे.

- अमोल भुयार,

शाखा प्रमुख, प्रहार इंझोरी

Web Title: Blood donation camp today at Injori