या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .डब्ल्यू. के. पोकळे व प्रमुख पाहुणे शारीरिक शिक्षण संचालक डाॅ. एस. डब्ल्यू. खाडे उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शासकीय रक्तपेढीचे सहकार्य लाभले. यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. के .व्ही. टार्फे, जनसंपर्क अधिकारी एस. के .दंडे, रक्तपेढी वैज्ञानिक एस. बी. डाखोरे , कोमल ढाकणे, परिचारिका सलोनी सावळे , परिचर लक्ष्मण काळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत कलाने, प्रास्ताविक प्रा. डाॅ . सचिन तायडे यांनी केले तर रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ .एस. के लांडे यांनी सर्वांचे आभार मानले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एन. लोहिया यांनी सर्व उपस्थितांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी प्राचार्य डॉ. पोकळे व डाॅ. के. व्ही. टार्फे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये पोलीस संतोष पाईकराव, भारतीय सेनेचे जवान कृष्णा काळे, ग्रंथपाल कल्पना मुरादे, प्रा डाॅ योगेश साखरे, प्रा रवी खडसे, प्रा डाॅ सीमित रोकडे, प्रा अपूर्व गुप्ता, प्रा संतोष गायकवाड, प्रा डाॅ जया सोमटकर, प्रा नियाजखां पठाण, प्रा श्रीकांत जहेरव, प्रा शिवाजी शेंडे, शिक्षक किशोर उंडाळ, समाधान सोमटकर, रमेश बोरकर, सदाशिव चवरे, अमोल शिंदे, वैभव भालेराव, सागर भालेराव, साक्षी ढोले व सचिन जाधव उपस्थित होते.
रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST