रक्तदान शिबिरात ७१ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:37+5:302021-09-18T04:44:37+5:30
शिवगणेश मंडळामार्फत मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत शेलूबाजार व परिसरातील गरजवंतांना मोफत जेवणाची व्यवस्था, आरोग्य तपासणी शिबिर, सॅनिटायजर चेंबरची व्यवस्था, ...

रक्तदान शिबिरात ७१ दात्यांचे रक्तदान
शिवगणेश मंडळामार्फत मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत शेलूबाजार व परिसरातील गरजवंतांना मोफत जेवणाची व्यवस्था, आरोग्य तपासणी शिबिर, सॅनिटायजर चेंबरची व्यवस्था, स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती, कोरोना लसीकरण शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. त्याचे उद्घाटन सरपंच प्रमिला पवार यांनी केले. उपसरपंच प्रा. रजनीश कर्नावट, सहायक पोलीस निरीक्षक मंजुषा मोरे, डॉ. कमलाकर सपकाळ, वाशिम येथील टाइगर ग्रुपचे रवींद्र पाटील पोफले, विनोद बोडखे, शुभम भगत, संजयआप्पा हापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवगणेश मंडळाचे सुशील अपूर्वा, मोहित कर्नावट, नवीन गाडगे, रोहित तोलम्बिया, आदित्य कोसे, पीयूष कर्नावट, अमित अपूर्वा, आनंद दिनोदे, पृथ्वीराज मांगूळकर, प्रतीक कोसे, सुजल बोबडे, गोलू बोबडे, बालाजी हिवरे, मनीष गवई, सागर भगत, अनिष कर्नावट, दिलीप हिवरे, प्रफुल अपूर्वा यांनी विशेष सहकार्य केले. अकोला येथील साईजीवन रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. दिनेश हिवराळे, हरीष नवकर यांनी रक्तसंकलन केले.
170921\1541-img-20210917-wa0013.jpg
रक्तदान करतांना सहाय्यक पोलीस निरिक्षक मंजुषा मोरे व मान्यवर