मंगरुळपीर येथे ३५ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:22+5:302021-07-10T04:28:22+5:30
लोकमतचे संस्थापक तथा थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित ...

मंगरुळपीर येथे ३५ जणांचे रक्तदान
लोकमतचे संस्थापक तथा थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ३५ जणांनी रक्तदान केले. यावेळी भाजपचे प्रदेश प्रतिनिधी,नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे,वीज कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मिसाळ,नंदलाल पवार,ध्यास संपर्कप्रमुख अश्विनी अवताडे, सचिन कुळकर्णी, नगरसेवक सचिन पवार, संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष सचिन मांढरे, प्रमोद घोडचर, नरेश ठाकूर, प्रशांत कळवे, प्रमोद पाटील, उमेश राठोड, भास्कर मुळे, रामा ठणठणकार, रामदास मोरे आदींची उपस्थिती होती. तसेच शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग -१,डॉ एल. एन. चव्हाण,डॉ श्रीकांत जाधव,डॉ रमेश आडे, शरद गावंडे, प्रकाश संगत तर शासकीय रक्तपेढी वाशिमचे डॉ. फुपाटे, सचिन दंडे, संदीप मोरे, लक्ष्मण काळे, अविनाश अवसारे यांनी सहकार्य केले.