‘ब्लड कॅन्सर’ग्रस्त हरीदासला हवी दात्यांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 03:32 PM2019-12-13T15:32:39+5:302019-12-13T15:32:53+5:30

हरीदासच्या वृद्ध मातापित्यांनी पोट उपाशी ठेवत हरीदासने जमलविलेल्या तुटपुंज्या रकमेत त्याच्यावर उपचार सुरू केले.

'Blood Cancer' sufferers need help from doners | ‘ब्लड कॅन्सर’ग्रस्त हरीदासला हवी दात्यांची मदत

‘ब्लड कॅन्सर’ग्रस्त हरीदासला हवी दात्यांची मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : रातालुक्यातील यशवंतनगर येथील हरीदास उकंडराव शेलकर या ३१ वर्षीय विवाहित शेतमजुर तरूणास ‘ब्लड कॅन्सर’चा दूर्धर आजार जडला आहे. मजुरीच्या भरवशावर पोट भरणाऱ्या हरीदासकडे उपचारासाठी पैसे नसल्याने त्याचे चिमुकले उघड्यावर येऊ नयेत म्हणून त्याचे वृद्ध आईवडिल उपचाराच्या खर्चासाठी दात्यांना मदतीचे आवाहन करीत आहेत.
यशवंत नगर येथील रहिवासी उकंडराव शेलकर यांना हरीदास नावाचा एक मुलगा आहे. जेमतेम १० वा वर्ग उत्तीर्ण झालेला हरीदास शेतमजुरी करून आपल्या कुटूंबाचे उदरभरण करतो. विवाहित हरीदासवर वृद्ध मातापित्यांसह पत्नी, एक मुलगा आणि एका मुलीची जबाबदारी आहे. शेतमजुरी करून समाधानाने आपल्यासह मातापिता, पत्नी आणि दोन मुलांचा सांभाळ करीत असतानाच हरीदास आजारी पडला. त्याला सतत ताप येऊ लागली. आजार बरा होण्याची चिन्हे दिसत नसल्याने हरीदासने कारंजा येथे एका खासगी दवाखान्यात तपासणी केली. त्यावेळी रक्तात पांढºया पेशींची संख्या वाढल्याचे निदान डॉक्टरांनी केले आणि नागपूर येथे जाण्याचा सल्लादिला. त्यावरून नागपूरच्या जामठा येथे एका खासगी दवाखान्यात तपासणी केली असता हरीदासला ‘ब्लड कॅन्सर’ झाल्याचे कळले. त्यामुळे हरीदासच्या वृद्ध मातापित्यांनी पोट उपाशी ठेवत हरीदासने जमलविलेल्या तुटपुंज्या रकमेत त्याच्यावर उपचार सुरू केले. आजवर त्यासाठी २ लाख ५० हजार रुपये खर्च त्यांना आला. आता त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसून, हरीदासच्या भरवशावरच त्याचे दोन चिमुकले, पत्नी आणि मातापित्यांची भीस्त आहे. आजारामुळे अघटीत घडून हरीदासचे चिमुकले उघड्यावर पडू नयेत म्हणून त्याचे मातापिता उपचारासाठी समाजातील दात्यांना मदतीचे आवाहन करीत आहेत.

 

Web Title: 'Blood Cancer' sufferers need help from doners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.