महावितरणच्या धोरणाविरोधात ‘भूमिपुत्र’चा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST2021-03-19T04:40:53+5:302021-03-19T04:40:53+5:30

कोरोनाच्या संकटात शेतकरी आधीच अडचणीत आलेले असताना महावितरणकडून सक्तीची वीजदेयक वसुली केली जात आहे. वास्तविक पाहता अधिवेशनादरम्यान सरकारने शेतकऱ्यांचे ...

Block the path of 'Bhumiputra' against the policy of MSEDCL | महावितरणच्या धोरणाविरोधात ‘भूमिपुत्र’चा रास्ता रोको

महावितरणच्या धोरणाविरोधात ‘भूमिपुत्र’चा रास्ता रोको

कोरोनाच्या संकटात शेतकरी आधीच अडचणीत आलेले असताना महावितरणकडून सक्तीची वीजदेयक वसुली केली जात आहे. वास्तविक पाहता अधिवेशनादरम्यान सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, अधिवेशन संपताच घुमजाव करून वीज तोडण्याचा सपाटा लावण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने कृषिपंपांची वीजतोडणी तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, मागील थकीत कृषिपंपांची वीज देयक थकबाकी पूर्णत: माफ करावी. यापुढे कृषिपंपांना मोफत वीज द्यावी, या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते तथा संघटक डॉ. जितेंद्र गवळी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, दीपक इंगोले, दीपक बरडे, सतीश गंगावणे, ज्ञानेश्वर सोमटकर, विठ्ठल अवचार, ग्यानदेव भुतेकर, सचिन काकडे, शिवाजी कढणे, विठ्ठल अवचार, मदन इंगळे, दत्तराव अवचार, प्रल्हाद धोंगडे यांची उपस्थिती होती.

Web Title: Block the path of 'Bhumiputra' against the policy of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.