नोंदणी केंद्रांवर पोहोचले ‘बीएलओ’
By Admin | Updated: June 30, 2014 01:55 IST2014-06-30T01:37:53+5:302014-06-30T01:55:09+5:30
लोकमतच्या स्टिंगने वाशिम जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा जागली: मतदार नोंदणीच्या अभियानाला गती

नोंदणी केंद्रांवर पोहोचले ‘बीएलओ’
वाशिम : निवडणुक आयोगाने हाती घैतलेल्या मतदार नोंदणी व याद्यांमधील दोष दुरूस्ती अभियानाचा बट्याबोळ करणार्या मतदान केंद्रस्तरिय अधिकार्यांच्या कामचुकारपणाचे लोकमतने २८ जूनला राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून बिंग फोडले. परिणामी, जिल्ह्याची निवडणूक यंत्रणा खळबळून जागी झाली. लोकमतच्या दणक्यामुळे २९ जूनला जिल्हाभरातील सर्व बीएलओ सकाळी ११ वाजताच आपल्या मतदान केंद्रावर पोहोचले. नव्हेतर दिवसभर त्यांनी केंद्रावर तळ ठोकून मतदार नोंदणीचे काम केले.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन निवडणूक आयोगाने अधिकाधिक मतदारांची नोंदणी करण्यासाठी ९ जूनपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू केली आहे. तर २८ व २९ या दोन दिवस विशेष अभियानही राबविले. मात्र, २८ जूनला अभियानाच्या पहिल्याच दिवशी मतदान केंद्रस्तरिय अधिकार्यांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवून या अभियानाचा फज्जा उडविला होता. लोकमतने स्टिंग मधून बीएलओंचा कामचुकापणा चव्हाट्यावर आणला. त्यामुळे २९ जूनला सर्वच बीएलओंनी केंद्रावर उपस्थिती दर्शविली.