बसस्थानकातील सुविधा कोलमडल्या
By Admin | Updated: February 27, 2015 00:55 IST2015-02-27T00:55:19+5:302015-02-27T00:55:19+5:30
मंगरूळपीर बस स्थानकावर सुविधांचा अभाव.

बसस्थानकातील सुविधा कोलमडल्या
मंगरूळपीर (जि. वाशिम): प्रवासाच्या सुविधेकरीता शासनाने २0 वर्षापूर्वी याठिकाणी लाखो रूपये खर्च करून बसस्थानकाची भव्य इमारतीची निर्मिती केली मात्र याठिकाणी सद्यस्थितीत (दि.२६) विविध सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाश्याना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात गत २0 वर्षापूर्वी बसस्थानकाची इमारत नसल्यामुळे प्रवाश्याना मोठया अडचणीशी समोर जावे लागत असे ही बाब लक्षात घेऊन शासनाने वाशिम रोड वर भव्य बसस्थानकाची निर्मिती केली एवढेच नव्हे तर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या सुरूवातीच्या काळात सर्व काही व्यवस्थीत होते एवढेच नव्हे तर मध्यतरीच्या काळात उत्पणात महाराष्ट्रामध्ये २ क्रमांकाचे आगार म्हणून नावारूपास आले होते. सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. याशिवाय या बसस्थानकात प्रवाश्याना बसण्याकरीता दिलेल्या खुच्र्या तुटक्या असल्याने प्रवाश्याना ताटकळत उभे राहून एसटीची प्रतिक्षा करावी लागत आहे. येथे स्वच्छतागृह आहे मात्र या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य पसरले. तसेच आहे अशा अनेक समस्यामुळे प्रवाश्याना मोठा त्रास सहन करावसा लागत आहे. अनेकदा एसटी बसेस उशिरा येणे ही बाब नित्याचीच असून प्रवाश्याची अंगवळनी पडल्याचे दिसुन येत आहे. आगरव्यवस्थापक राम चवरे यांनी बसस्थानकावर नळाची नितांत गरज लक्षात घेऊन पालीकेकडे निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचे सांगीतले. सद्यस्थितीत बोअरचे पाण्याची पातळी घटल्यामुळे बसस्थानकावरील नळ बंद अवस्थेत असल्याचे त्यांनी मान्य केले.