सृष्टी सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दृष्टिहिन बंडुची वाशिमला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:58 IST2019-06-12T17:56:28+5:302019-06-12T17:58:20+5:30
सृष्टी कशी आहे पाहिले नसले तरी सृष्टीला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहणाºया दृष्टीहिन बंडु धुर्वे यांनी वाशिमला भेट दिली.

सृष्टी सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दृष्टिहिन बंडुची वाशिमला भेट
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वर्धा जिल्हयातील रानवाडी या छोटयाश्या गावातील एक समाजसेवी तरुण, सृष्टी कशी आहे पाहिले नसले तरी सृष्टीला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहणाºया दृष्टीहिन बंडु धुर्वे यांनी वाशिमला भेट दिली. यावेळी त्यांनी वाशिमकर गृपच्या सदस्यांशी विविध विषयांवर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमावर चर्चा केली.
वाशिम शहरामध्ये जलदुतांचा समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण असल्याने ते वर्धेहून ७० कि.मी. असलेल्या रानवाडी गावातून वाशिमला येण्यासाठी सकाळी ७ वाजता निघालेत. परंतु प्रवासात वेळ गेल्याने ते गाडया बदलत बदलत कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पोहचले. येथे आल्यानंतर विशेष करुन वाशिमकर गृपच्या सदस्यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्या अनुभवांचा, त्यांच्या कार्याबाबतची माहिती जाणून आपल्या उपक्रमाची माहिती दिली. त्यावर त्यांनी सदस्यांना मोलाचे मागर्दर्शन केले. बंडु धुर्वे ५६ तालुक्यातील हजारो गावात जावून पाणी फाउंडेशन अंतर्गंत वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान करुन गावकºयांचा उत्साह वाढविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. महाराष्टÑ ब्लार्इंड क्रीकेट असोशिएशनच्या संघाचा खेळाडू असलेले बंडु धुर्वे यांच्यासोबत आमिर खान आणि किरण राव यांनी त्यांच्या गावाला भेट दिली. बंडुच्या संघासोबत आमिर खान यांनी डोळयाला पट्टी बांधून क्रीकेटही खेळले. विशेष म्हणजे बंडु धुर्वे यांचे २८०० मोबाईल क्रमांक त्यांच्या अगदी तोंडपाठ आहे. बंडु धुर्वे यांचा वाशिमकर समुहाच्यावतिने सत्कार करण्यात आला यावेळी सदस्यांसह शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.