ऑटो जाळल्याच्या वादातून निर्घृण हत्या

By Admin | Updated: March 3, 2015 01:37 IST2015-03-03T01:37:09+5:302015-03-03T01:37:09+5:30

उकळीपेन येथील घटना.

Blasphemy murders | ऑटो जाळल्याच्या वादातून निर्घृण हत्या

ऑटो जाळल्याच्या वादातून निर्घृण हत्या

वाशिम / अनसिंग : येथून जवळच असलेल्या उकळीपेन येथे ऑटो जाळल्याच्या वादावरून एका इसमाची काठीने बेदम मारहाण करून हत्या केली. ही घटना रविवार १ मार्च रोजी घडली. अनसिंग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उकळीपेन येथील रहिवासी गजानन आकाश वाघजळे याने किरकोळ वादातून रवी चोखाजी धवसे याचा ऑटो २५ फेब्रुवारी रोजी जाळल्याचा प्रकार घडला होता. रविवारी सायंकाळी गजानन वाघजळे घराजवळून जात असताना झालेल्या नुकसानाचा वचपा काढण्यासाठी रवी चोखाजी धवसे याने गजाननला गाठून त्याच्यावर काठीने हल्ला चढविला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या गजाजन वाघजळेचा (३९) मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार कदम, एम.एम. पठाण, प्रकाश अहिर यांनी घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतकाचे वडील आकाश वाघजाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी रवी धवसे याच्याविरुद्ध कलम ३0२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे व अपर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.पी. पाटील, जमादार बुद्धु रेघीवाले, विनोद अवगळे, विपुल शेळके, संदीप ईढोळे, चालक मिलिंद गायकवाड यांचा समावेश असलेल्या पथकाने मुख्य आरोपी रवी धवसे याला जालना येथून अवघ्या २४ तासामध्ये अटक केली.

Web Title: Blasphemy murders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.