भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी - आमदार राहुल बोंद्रे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 05:55 PM2018-12-23T17:55:38+5:302018-12-23T17:56:17+5:30

वाशिम : राफेल घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून विद्यमान भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे, अशी टिका काँग्रेस पक्षाचे पश्चिम विदर्भ प्रवक्ता तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

BJP government is most curupted - MLA Rahul Bondre | भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी - आमदार राहुल बोंद्रे  

भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी - आमदार राहुल बोंद्रे  

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राफेल घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून विद्यमान भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे, अशी टिका काँग्रेस पक्षाचे पश्चिम विदर्भ प्रवक्ता तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
स्थानिक जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात राफेल घोटाळाप्रकरणी झालेल्या पत्रकार परिषदेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, माजी आमदार सुरेश इंगळे, माजी आमदार किसनराव गवळी, माजी जि.प.सदस्य राजू चौधरी, डॉ.सुधीर ढोणे, सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ.विशाल सोमटकर, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष प्रा.अबरार मिर्झा,  बुलडाणा जि.प.सदस्य अशोकराव पडघान, पिरुभाई बेनिवाले, वाय.के.इंगोले,  प्रा.दादाराव देशमुख, माजी जि.प.सदस्य दिलीप देशमुख, महादेवराव सोळंके उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार बोंद्रे पुढे म्हणाले की, मोदी सरकारने राफेल खरेदीत ४१ हजार कोटी रुपयांचे देशाचे नुकसान केले. काँग्रेस शासनाच्या काळात ५२६.१० कोटी रुपयांची किंमत असलेल्या राफेलची खरेदी मोदी सरकारने १६७०.७० कोटी रुपये दराने केल्यामुळे या व्यवहारात ४१ हजार २०५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असे आमदार बोंद्रे म्हणाले. राफेल संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी चुकीची माहिती देवून सर्वोच्च न्यायालयाची फसवणुक केली. ज्वार्इंट पार्लमेंटरी कमिटीकडून चौकशीची मागणी काँग्रेसने लावून धरल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: BJP government is most curupted - MLA Rahul Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.