शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले -  नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 4:39 PM

भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली.  

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : शेतमालाला समाधानकारक भाव नाही, पीक विम्याचा लाभ नाही, कर्जमाफीत असंख्य चुका यासह भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली.  मालेगाव बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित महापर्दाफाश यात्रेला आमदार अमित झनक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, डॉ. श्याम गाभणे, बाजार समिती सभापती किसनराव घुगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पटोले म्हणाले, पीक विम्याचे पैसे सर्व शेतकºयांना मिळालेले नाहीत. देश आर्थिक संकटात सापडला आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने केवळ ३५० कोटी रुपयांमध्ये देशात स्थिरता आणून  रस्ते, वीज, शाळा व अन्य सुविधा उपलब्ध करून शक्तिशाली देश तयार केला. आता मात्र विद्यमान सरकारच्या एकहाती सत्ता असूनही देश आर्थिक संकटात सापडला आहे. भाजपा सरकारने जनतेला फसवण्याचे काम केले असून भुलथापा मारणारे सरकार उखडून फेका, असे आवाहनही पटोले यांनी केले. प्रास्ताविक शाम उमाळकर यांनी तर संचालन व आभार रामेश्वर पवार यांनी केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाwashimवाशिम