शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘बायोमेट्रीक’मुळे रॉकेलच्या कोट्यात ६० टक्के बचत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:31 IST

स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यासह रॉकेलचे वितरण बायोमेट्रीक पद्धतीने ‘ई पॉस मशीन’व्दारे केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जून २०१७ या महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यासह रॉकेलचे वितरण बायोमेट्रीक पद्धतीने ‘ई पॉस मशीन’व्दारे केले जात आहे. यामुळे बोगसगिरीला चाप बसण्यासोबतच धान्य वितरण प्रक्रिया सुरळित झाली आहे. रॉकेलच्या कोट्यातही ६० टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली.संपूर्ण संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत सर्व ठिकाणच्या रास्तभाव दुकानांमध्ये ई पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत. याव्दारे पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतरच धान्य आणि रॉकेलचे वितरण केले जात आहे. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था गतीमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणे शक्य झाले आहे. ‘पोर्टबिलिटी’मुळे राज्यातील कोणत्याही धान्य दुकानांतून धान्य मिळणेही शक्य झाल्याने रोजगारासाठी स्थलांतरण करणाऱ्या कुटूंबियांना त्याचा विशेष फायदा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण‘ई पॉस’मुळे धान्य व रॉकेलमध्ये होणारा काळाबाजार रोखणे शक्य झाले असून सर्व शिधापत्रिका आधारकार्डशी जोडण्यात आल्याने पात्र लाभार्थींना नियमित धान्य मिळू लागले आहे. जून २०१७ पासून सर्व रास्तभाव दुकानांमधून ई- पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात आहे. तसेच १ मे २०१८ पासून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम