दसऱ्याच्या मुहुर्तावर वाहन, सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 17:04 IST2020-10-27T17:04:18+5:302020-10-27T17:04:42+5:30
Billions of turnover in vehicle, bullion market वाहन, सराफा, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी झाल्याचे दिसून आले.

दसऱ्याच्या मुहुर्तावर वाहन, सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल!
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अनलॉकनंतरचा दसरा हा पहिलाच मुहुर्ताचा सण असल्याने या दिवशी वाहन, सोने-चांदी खरेदी-विक्रीतून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा दावा व्यावसायिकांनी केला.
यंदा कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊनमध्ये मार्च ते मे या महिन्यात लग्नसराईसह गुढीपाडवा, अक्षय तृतियेसारख्या महत्वाच्या मुहुर्तावर नागरिकांना कोणतीही खरेदी करता आली नाही. जून महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑक्टोबरमध्ये अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये बरीच शिथिलता मिळाली. अनलॉकनंतरचा विजयादशमी, दसरा हा पहिलाच मुहुर्ताचा सण असल्याने या दिवशी वाहन, सराफा, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी झाल्याचे दिसून आले.
अनलाॅकच्या टप्प्यात वाहन बाजारासाठी यावर्षी दसऱ्याचा मुहुर्त हा लाखमोलाचा ठरला. वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीतून दसऱ्याच्या दिवशी जिल्ह्यात जवळपास सात ते आठ कोटींची उलाढाल झाली.
- रवी पाटील डुबे
ट्रॅक्टर वितरक, वाशिम
गुढीपाढवा, अक्षयतृतिया सारखे मुुहुर्त कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ झाले होते. दसऱ्याचा मुहुर्त हा सराफा बाजाराला नवचैतन्य देऊन गेला.
- गोविंद वर्मा
सराफा व्यावसायिक,
वाशिम