भारिप-बमसंचे उमेदवार जाहीर
By Admin | Updated: September 21, 2014 22:36 IST2014-09-21T22:36:26+5:302014-09-21T22:36:26+5:30
भारिप-बहुजन महासंघाच्या वाशिम जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार घोषीत.

भारिप-बमसंचे उमेदवार जाहीर
वाशिम : भारिप-बहुजन महासंघाने वाशिम विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. रिसोड व कांरजा मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्याला मात्र पक्षाने अद्याप बगल दिली आहे. उमेदवार जाहीर करणारा हा पक्ष पहिला ठरला आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया २0 सप्टेंबरपासून अधिकृत सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी भारिप-बहुजन महासंघाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित असलेल्या वाशिम मतदार संघातून मिलींद पखाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित दोन मतदार संघातील उमेदवार पक्षाने अद्याप जाहीर केलेले नाहीत.