शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
2
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
3
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
4
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
5
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
6
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
7
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
8
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
9
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
10
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
11
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
12
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
13
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
14
संसदेत बारामतीचे तीन खासदार, सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज; विराेधात कुणीच नाही
15
Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...
16
'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल
17
सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया
18
१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी
19
येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले
20
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान

Bharat Jodo Yatra: बिबे फोडणाऱ्या महिलांशी राहुल गांधींचा संवाद

By संतोष वानखडे | Published: November 17, 2022 10:03 AM

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी यात्रा मार्गावरच्या अमानी गावातील बिबे फोडणाऱ्या महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. बुधवारी वाशिमहून अकाेल्याच्या दिशेने पदयात्रा निघाली.

- संतोष वानखडेवाशिम : राहुल गांधी यांनी यात्रा मार्गावरच्या अमानी गावातील बिबे फोडणाऱ्या महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. बुधवारी वाशिमहून अकाेल्याच्या दिशेने पदयात्रा निघाली. वाशिम-मालेगाव महामार्गावरील अमानी गावाची लोकसंख्या जवळपास ४ हजारांच्या आसपास असून, अनेक वर्षांपूर्वी गावाच्या परिसरात असलेल्या जंगलातून ग्रामस्थ बिबे गोळा करून त्यामधून गोडंबी काढण्याचे काम करीत आहेत. महिला हाताने गोडंबी फोडतात. यामुळे त्यांना त्वचारोगही होतात. बिबे फोडून गोडंबी काढताना नेमक्या काय समस्या जाणवतात, याची माहिती राहुल यांनी घेतली.

हिमाचलचा दिव्यांग सूरज पदयात्रेत सामील वाशिम :  भारत जोडो पदयात्रेत हिमाचल प्रदेशातील सूरज कुमार शर्मा हा दोन्ही हात नसलेला तरुण तेलंगणा येथून सहभागी झाला असून, तो यात्रेसोबत काश्मीरपर्यंत जाणार आहे. पूर्ण उत्साहाने तो पदयात्रेत चालत आहे. सूरजने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले असून, दोन्ही हात नसतानाही त्याची शिक्षणात उंच भरारी घेण्याची इच्छा आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीwashimवाशिम