शाैचालय वापराबाबत लाभार्थींची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:31+5:302021-05-30T04:31:31+5:30

................ पांदण रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वाशिम : तालुक्यातील पांडवउमरा, दगडउमरा या गाव परिसरातील पांदण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली ...

Beneficiaries' indifference towards toilet use | शाैचालय वापराबाबत लाभार्थींची उदासीनता

शाैचालय वापराबाबत लाभार्थींची उदासीनता

................

पांदण रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

वाशिम : तालुक्यातील पांडवउमरा, दगडउमरा या गाव परिसरातील पांदण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे विशेषत: पावसाळ्यात शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

.................

दुसऱ्या डोसपासून अनेक जण वंचित

वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथे ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अनेकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, त्यातील बहुतांश जण दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

.................

संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी

वाशिम : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार, शनिवारी आययूडीपी काॅलनीत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात आली.

.............

वाशिम शहरात जंतुनाशक फवारणी

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राखली जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच वाशिम नगर परिषदेने गेल्या काही दिवसांपासून जंतुनाशक फवारणीचे काम हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

...............

पेट्रोल पंपांवर नियमांचे उल्लंघन

वाशिम : अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी ११ वाजेनंतर इतर कोणालाही पेट्रोल देऊ नये, अशा सूचना प्रशानाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर या नियमाचे उल्लंघन करण्यात येत आहे.

Web Title: Beneficiaries' indifference towards toilet use