जलयुक्त शिवार : जांब येथे 'रिचार्ज पीट'च्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:14 IST2018-04-13T17:14:05+5:302018-04-13T17:14:05+5:30
मंगरुळपीर: शहरापासून जवळच असलेल्या जांब येथे १३ एप्रिल रोजी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वॉटर रिचार्ज पीटच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

जलयुक्त शिवार : जांब येथे 'रिचार्ज पीट'च्या कामाला सुरुवात
मंगरुळपीर: शहरापासून जवळच असलेल्या जांब येथे १३ एप्रिल रोजी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वॉटर रिचार्ज पीटच्या कामाला सुरुवात करण्यात आली. उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच साहेबराव भगत,वाटर हिरो गजानन भगत,शरद चुंबळे, भाष्कर अव्हाळे, तालुका समन्वयक देंवेद्र राऊत, मधुकर अव्हाळे, महादेव भरदुक, गोपाल भोंगळे, विश्वनाथ इंगळे, नितीन भोंगळे, धनंजय अव्हाळे, बारकुजी भगत, रवि चुंबळे, दादाराव चुंबळे, गौतम अंभोरे, जलमित्र एन. पी. देवळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गावालगत असलेल्या नाल्यांमध्ये कूपनलिका खोदून २५ रिचार्ज पिट केले जाणार आहेत. जाणार आहे. या रिचार्ज पीटच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्यासाठी पावसाचे कोट़यवधी लीटर पाणी जमिनीत मुरविले जाणार आहे. त्यामुळे गावातील हातपंप व शेतातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार असून, ही गावकºयांसाठी खूप मोठी उपलब्धी आहे. याशिवाय गावकºयांनी श्रमदानाकरिता पुढाकार घेऊन आपल्या गावशिवाराची भुजल पातळी वाढविण्यास हातभार लावणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.